ग्रेसच्या कवितेत निसर्ग- श्रीनिवास हवालदार आणि भालचंद्र लिमये
१.भूल
प्रकाश गळतो हळू हळू कि; चंद्र जसा उगवे
पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे
दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका
दु:ख सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका
हिमनगरातील बर्फ धुळीचे उत्सव भरले नवे
धुक्यात तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचे हे थवे
मंदीर मंदीर पाणी पाणी शिल्प कुठे वितळे
दु:खाच्या तंद्रीतून जैसे अमृत ठिबकत निळे
माझ्या हातून मूठभर माती अवकाशावर पडे
घराघरांना मरण फुलांची गंधित भूल जडे
2. 'आठवण'....
"या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो .
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे ..
मी अपुले हात उजळतो .
तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची समई
कधी असते माझ्यापाशी ...
पदराला बांधून स्वप्ने
तू एकट संध्यासमयी
तुकयाचा हातांमधला
मी अभंग उचलून घेई ...
तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा ..
सन्यस्त सुखाचा कांठी
वळीवाचा पाउस यावा !"
3. निळ्या पाखरांची निळी पाउले
निळ्या पाखरांची निळी पाउले
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेउन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले
4 शब्दांनी हरवुन जावे
शब्दांनी हरवुन जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ
वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल
गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल
तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ.
5. मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी
कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात
ये सुगंधी गारवा
रात्र सुर पेरुनी
अशी हळू हळू भरे
समोरच्या धुक्यातली
उठून चालली घरे
गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दु:ख बांधुनी असे
क्षितीज झाकिले कुणी?
एकदाच व्याकुळा
प्रतिध्वनित हाक दे
देह कोसळून हा
नदीत मुक्त वाहु दे..
6.तुला पाहिले मी नदीच्या किनारी-
‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
या वृक्षमाळेतले सावळे !
तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली
मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू, तुझे दुःख झरते ?
जसे संचिताचे ऋतु कोवळे
अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुडा
7.कंठात दिशांचे हार
कंठात दिशांचे हार निळा अभिसार वेळूच्या रानी
झाडीत दडे देऊळ गडे येतसे जिथून मुलतानी.
लागली दरीला ओढ कुणाची गाढ पाखरे जाती
आभाळ चिंब चोचीत बिंब पाउस जसा तुजभवती.
गाईंचे दुडुदुडु पाय डोंगरी जाय पुन्हा हा माळ
डोळ्यांत सांज वक्षांत झांज गुंफिते दिव्यांची माळ.
मातीस लागले वेड अंगणी झाड एक चाफ्याचे
वाऱ्यात भरे पदरात शिरे अंधारकृष्ण रंगाचे.
मेघांत अडकले रंग कुणाचा संग मिळविती पेशी ?
चढशील वाट ? रक्तात घाट पलिकडे चंद्र अविनाशी
8.
ग्रेस यांचा अरण्यातला आणखी एक प्रवास - श्रीनिवास हवालदार
हिवाळ्यात घोडा जरा वाकला ,
मी पापणीतूनही स्निग्ध तेजांध
डोळ्यांत चंद्रास्तही झाकला.
अता पाहण्याला मुळी अंत नाही
तुझ्या पैंजणी नादनक्षी पुढे;
पारावरी पेटलेल्या चितेतून
ये चांदणी शुभ्र बर्फाकडे ...
भयाने मला भारते अंतवेळा
जशी सांध्यसत्वातली स्वप्नजा;
त्या आत्मजेनेच तोडून नेल्या
तुझ्या सावलीतून माझ्या भुजा...”
- ग्रेस
सुपब..वाॅव
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteGraceful !
ReplyDeleteThank you!
ReplyDelete